व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी ते देहूरोड या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. वाहनचालक व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी हा मार्ग वाहतुकीस तातडीने खुला करावा, अशी मागणी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असुन शुक्वारी दि.३० आक्टो रोजी दुपारी रास्ता रोको आंदोलन करणार असे व्हीएसआरएस न्युज शी बोलताना सचिन काळभोर यांनी सांगितले आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकात निगडी ते देहरोड मार्गावरील उमणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्गवाहतुकीस खुला करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर केली होती. त्यासाठी
त्यांनी गेल्या महिन्यात आंदोलनही केले होते. येथील रस्ता वाहतुकीस बंद असल्याने वाहनचालक व नागरिकांना सुमारे अडीच किलोमीटरचा वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पूल तातडीने खुला करुन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी
मागणी त्यांनी केली होती. तसेच, क्षेत्रीय समिती अध्यक्षा शर्मिला बाबर यांनाही उड्डाणपुलावरून तत्काळ वाहतुक सुरू करण्याची मागणी केली आहे. महापौर उषा ढोरे यांनी ही अधिकारी व ठेकेदारांना लवकरात लवकरच काम पूर्ण करून उड्डाणपुल वाहतुकीस खुला करण्याच्या सूचना केल्या आहेत.