व्हीएसआरएस न्युज -निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन प्राधिकरण पोलिस चौकी समोर करण्यात आले. अ प्रभाग क्षेतिय अध्यक्ष शर्मिला बाबर यांनीसुद्धा यासंदर्भात लेखी पत्र यावर केला होता या भागात वाहतुकीसाठी अडीच ते तीन किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे निगडी ते देहू रोड उड्डाणपूल काम शंभर टक्के पूर्ण झाले असून काही राजकीय नेत्यांच्या हट्टासाठी हा उड्डाणपूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नाही. यापूर्वीसुद्धा उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर चालू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन हा उड्डाणपूल चालू करावा म्हणून आंदोलन करण्यात येत आहे. सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर सचिन काळभोर ,सचिन शिंदे, स्वप्निल पवार ,भरतं पवार, संजय कहार, पिटटू लोंढे ,विकास कांबळे पप्पू बोंडे, सागर मोरे ,सागर बोराडे, नवनाथ लांडे ,पप्पू हातागळे ,जयदेव भुवड, फुआराम चौधरी, जगदीश चौधरी, गोरव रोदाळे, अक्षय सावंत, रमेश वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.