व्हीएसआरएस न्युज –पिंपरी :‐ पाण्याच्या टाक्या बांधणे व नव्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामात स्पर्धा न झाल्याने फेरनिविदा काढाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पत्राद्वारे श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
वाघेरे पत्रात म्हणतात की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याच्या टाक्या बांधणे व नव्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी ५२ कोटी रुपयांच्या निविदेत मे.
एस.एस. साठे यांनी ३.३५ टक्के जादा दाराची निविदा भरली आहे. तर मे.इंगवले पाटील १८.९० टक्के जादा दराची निविदा भरली आहे. या कामाच्या ३ निविदा येणे अपेक्षित असताना फक्त
२ ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा झाली नाही. तसेच टाकी बांधण्याच्या कामाची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याचे कळून आलेले आहे. जर महानगरपालिकेच्या
ताब्यातच जागा नाही तर टाकी बांधण्याच्या अट्टहास कोणासाठी चाललेला आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामाची पुन्हा निविदा काढण्यात यावी व हा विषय मंजूर करू नये.
मे.एस.एस. साठे यांना काम देऊ नये ग्लोबल टेंडर काढावे अन्यथा मला आपल्या विरोधात न्यायालयात जावे लागेल.