व्हीएसआरएस न्युज प्रतिनिधी पिंपरी- पिंपरी चिंचवड वकील संघटना यांनी शहरातील वकीलांसाठी कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिका विकास ढेकणे (अति आयुक पि. चि. मनपा) यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.
मनपा ने बार असोसएशन ला पत्र पाठवून लसीकरणाची मागणी मान्य झाल्याचे कळवण्यात आले आहे.
ज्या वकिलांना महोदयांन लसीकरण करण्याचे आहे .सदर वकिलांची यादी महानगरपालिकेने मागवली आहे.वकील हा रोज नायायालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी न्यायालयात करोणा काळातही जीव धोक्यात टाकून काम करीत असतो. बार असोसएशनचे माजी अध्यक्ष ॲड .दिनकर बारणे ,ॲड संजय दातिर ,ॲड.सुभाष चिंचवडे तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे शिस्तपालन समितीने मा सदस्य ॲड अतिश लांडगे यांनी बार कौन्सिल चे मा ॲड.राजेंद्र ऊमाप(सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा)यांच्या माध्यमातून आज पर्यंत ३५० ते ४०० वकिलांना ८ ते ९ लाख रू चे धान्य वाटप करण्यात आले आहे.अशी माहिती बार असोसएशनचे अध्यक्ष गोरक्षनाथ झोळ यांनी दिली .ते पुढे म्हणाले यापुढेही गरजू वकिलांना धान्य वाटप करण्यात येणार आहे.
महापालिकेकडून लसिकरण मिळण्यासाठी
ॲड. नितीन लांडगे (स्थायी समिती सदस्य) , पालिकेचे कायदा अधिकारी श्री.चंद्रकांत इंदलकर ,ॲड.अतिश लांडगे,सचिव ॲड.महेश टेमगिरे,तसेच बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड.गोरक्षनाथ झोळ यांनी प्रयत्न केले.