व्हीएसआरएस न्युज पिंपरी- शहरातील काळेवाडीतील एका 65 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात आजपर्यंत 1 लाख 3421 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 98 हजार 362 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1831 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 772 अशा 2603 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 1035 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 625 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 19 हजार 86 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 937 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 105 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.