व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 408 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 414 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद.
सांगवीतील 77 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला.
शहरात आजपर्यंत 1 लाख 4911 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 99 हजार 743 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1837 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 772 अशा 2609 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 833 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 875 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 22 हजार 826 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 1197 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 233 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.