व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड
शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात वल्लभनगर येथील 75 वर्षीय वृद्ध, खेड येथील 68 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आजपर्यंत 87 हजार 996 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 710 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1529 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 634 अशा 2163 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 849 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1623 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 996 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.