व्हीएसआरएस न्युज –
पुणे – राज्य सरकारच्या परवानगीनंतर रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 12 ऑक्टोबरपासून पुणे-लोणावळा-पुणे मार्गावर लोकलच्या 4 फेऱ्या सुरू केल्या.
दररोज केवळ सकाळी आणि सायंकाळी लोकल धावत होत्या. सोमवारपासून (दि. 26) याच्या संख्येत 4 ने वाढ झाली असून, आता या मार्गावर 8 फेऱ्या होणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
येत्या काळात या मार्गावर सकाळी 6.25, 8:05 वाजता आणि सायंकाळी 4.15, 6.02 वाजता लोकल धावणार आहे.
लोणावळा ते पुणे मार्गावर सकाळी 9.55, 5.30, 5:50, 7.35 वाजता धावणार आहे. या गाडीला मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबा दिला आहे.