व्हीएसआरएस न्युज पिंपरी- राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. काही शहरांमध्ये रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शासकीय व खाजगी ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. मास्क न मास्क न वापरणाच्या ५०० रूपये आणि रस्त्यावर थुंकणार्याला १००० रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातही सध्या कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात ७०० हून अधिक पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेत. दरम्यान राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. शासकीय व खाजगी ठिकाणी मास्क न वापरता संचार करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिलेत. त्याच बरोबर या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस देखील कारवाई करणार आहेत.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केलेली नियमावली खालील प्रमाणे….
१) पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाने शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, शासकीय व खाजगी कार्यालये याठीकाणी संचार करताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व मंगल कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकिय, क्रीडा, मनोरंजन, सांकृतिक, शैक्षणिक उपक्रम. सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व नागरीकांना संचार करताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे यापुर्वी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार वर नमुद केलेल्या सर्व ठिकाणी नागरीकांची गर्दी होणार नाही याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. जेणे करुन कोवीड-१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करणे शक्य होईल. तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशांमध्ये नमुद केल्यानुसार वरील ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या संख्येचे पालन होणे आवश्यक आहे.
३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपहारगृहे इत्यदी ठिकाणी नागरीकांना संचार करताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
४) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व मनपा कार्यालये तसेच सरकारी व खाजगी कार्यालयामध्ये मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
५) या अनुषंगाने मास्क न वापरणाच्या नागरिकांस ५०० रूपये व रस्त्यावर व सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांस १ हजार रूपये तडजोड शुल्क आकारण्यात येणार आहे.
६) पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ८क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक यांना मास्क न वापरणाच्या नागरिकांस ५०० रूपये व रस्त्यावर व सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांस १ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच सदरच्या कारवाईचे प्रभावी व कडक परिणाम होण्याच्या दृष्टीने हे अधिकार सर्व पोलिसांना पण देण्यात येत आहेत.
७) उपरोक्त नमुद नागरीकांची गर्दी होणेचे ठिकाणी, सहाय्यक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक, अतिक्रमण निरिक्षक, परवाना निरिक्षक व कार्यालय अधिक्षक यांनी वेळोवेळी भेटी देऊन नागरिक मास्क वपाराबाबतच्या आदेशांचे पालन करत आहेत कींवा नाही याबाबत पाहणी करावी. जे नागरिक मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करत आहेत. त्यांचेवर कडक कारवाई करणेत यावी.
८) मुखपट्टी (मास्क) वापराबाबत यापुर्वी निर्गमीत केलेले आदेश कायम राहील.
९) यापुर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम, त्याकरीता निर्गमित केलेल आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरु राहतील.
१०) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश/ मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
११) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले
आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.