व्हीएसआरएस न्युज पिंपरी- प्रदीप मस्तुद यांचे औद्योगिक काम व सामाजिक कामाची कुशलता पाहून या संस्थेने श्री. मस्तुद यांना पुणे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संस्थेत सर्व शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रोफेशनल असलेल्या व्यक्ती काम करत असून या संस्थेचे काम संपूर्ण भारत देशात सुरु आहे.
एफडीसीडब्लूसी हि संस्था अन्न, औषध, सौंदर्य प्रसाधन, दवाखाने, हॉटेल्स, कृषि आणि इतर सेवा उद्योग क्षेत्रात समाज हितार्थ कार्य करत असून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक जागरूकता करण्याचे काम करत आहे.
या संस्थेचे संस्थापक डॉ. पवन अगरवाल, राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर मोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. शशिकांत बामने असून त्यांनी पुणे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदीप मस्तुद यांना दिली असून, त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने संस्थे अंतर्गत अनेक सामाजिक, आर्थिक व आपल्या भारत देशासाठी भक्कम कार्यक्रम राबवता येतील व आपला समाज / देश कसा सक्षम करता येईल यावर आम्ही व आमच्या संस्थेतील सर्व कार्यक्षम अधिकारी, कर्मचारी काम करू व देश सुजलाम सुफलाम बनवू असा विश्वास प्रदीप मस्तुद यांनी व्यक्त केला.
चिंचवड उद्योग नगरीतील युवा उद्योजक प्रदीप मस्तुद यांची फुड अँड ड्रग्स कंन्ज्युमर वेल्फेयर कमिटी महाराष्ट्र या संस्थेवर पुणे जिल्हा अध्यक्ष – (प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन विभाग) यां पदावर निवड करण्यात आली आहे.
निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.गणेश जवादवाड, चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.सतिश माने, पिंपरी चिंचवड़ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष प्रसाद कोलते, पिंपरी चिंचवड़ लघु उध्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे तसेच भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी प्रदीप मस्तुद यांचे जिल्हा अध्यक्ष निवडीबद्धल अभिनंदन केले.