व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
प्रभागाची आँनलाईन बैठक घ्या स्वी सदस्य दिनेश यादव याची आयुक्त कडे मागणी
करोना मुळे प्रभागाच्या बैठका ,मासिक सभा बंद आहेत त्यामुळे प्रभागातील अनेक कामे रखडले आहेत.थोड्याच दिवसांत पाऊसाळा सुरू होईल ततपुर्वी केली जाणारी नाला सफाई, पाऊसाळी पाणी वाहुन नेणारी नलिका सफाई, रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे,नदीवर असलेली जलपर्णी काढणे,ही कामे पूर्ण करु घेणे गरजेचे आहे त्यामुळे पाऊसामध्ये येणाऱ्या अचडणी कमी होतील त्याचप्रमाणे धुर फवारणी, औषधे फवारणी याचे नियोजन करणे हे ही महत्त्वाचे आहे
सध्या करोना आजारावर नियत्रण करण्यासाठी प्रभागावरील नियोजन याबद्दल माहिती लसीकरण बद्दल असलेल्या अडचणी त्यावर उपाययोजणा यासर्व गोष्टी चर्चा करण्यासाठी प्रभागावर आँनलाईन बैठक घेणे गरजेचे आहे त्यामुळे नगरसदस्स, स्वी सदस्य, अधिकारी यामध्ये एक चांगली चर्चा सत्र घडवुन येऊन प्रभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल यामध्ये करोना नियमांचे उल्लंघन होणार नाही सध्या महानगरपालिका ची सभा ही आँनलाईन पध्दतीने होते त्यामुळे अनेक समस्या सुटतात पण स्वी सदस्य ना समस्या माडण्यासाठी प्रभागाची बैठक हे एकच ठिकाण आहे त्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाची आँनलाईन बैठक घ्यावी अशी मागणी स्वी सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे