व्हीएसआरएस न्युज पिंपरी- प्रभाग क्र. 1 चिखली येथील स्मशानभूमी मध्ये विद्युत शवदाहिनीचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष यश साने यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पिं.चिं.महानगरपालिका प्रभाग क्र. 1 चिखली येथील स्मषानभूमी मध्ये विद्युत, गॅस षवदाहिनीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. कारण प्रभाग क्र. 1, 2, 11, 12 येथील वाढती लोकसंख्या असल्यामुळे चिखली येथील स्मषान भूमीवर ताण येत आहे. तसेच या भागामध्ये निगडी येथे एकच विद्युत शव दाहिनी असल्यामुळे निगडी स्मशानभूमी येथे निगडी, यमुनानगर, मोरेवस्ती, आकुर्डी, तळवडे, कृश्णानगर, संभाजीनगर, प्राधिकरण, कुदळवाडी, जाधववाडी वगैरे भागातून नागरिकांना अंत्यविधीसाठी स्मषान भूमी मध्ये ये जा करावी लागते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्मषानभुमीवर ताण वाढतो आहे. शासनाच्या आदेशाने चिखली येथील स्मषान भूमी मध्ये 2 विद्युत गॅस षवदाहिनी, विद्युत षवदाहिनी बसवण्याचे काम लवकरात लवकर व्हावे. त्यासाठी लागणारी योग्य जागा उपलब्ध आहे. तसेच षासनाच्या निधीतुन सुध्दा् हे काम लवकरात लवकर करता येईल.
जनतेचा रेटा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या विद्युत शवदाहिनीचे लवकरात लवकर व जलद गतिने होईल असेही म्हटले आहे.