व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
मा.खासदार अमर साबळे यांचे खंदे समर्थक , व मुंडे गटातील जुने कार्यकर्ते, भाजप चे मा.युवा सरचिटणीस वैजनाथ शिरसाट यांचा आम आदमी पार्टीत झुम ॲप द्वारे ऑनलाइन प्रवेश करण्यात आला.
या वेळी आम आदमी पार्टी चे प्रदेश संघटक विजय कुंभार, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किरद, संघटनमंत्री अभिजित मोरे, आप वाहतूक अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप जी शर्मा व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपमध्ये जुन्या नव्यांचा
वाद कायम चालू आहे 2018 मधे वैजनाथ शिरसाट यांच्या सह अन्य भाजप च्या 200 कार्यकर्त्यांनी भाजपा ओल्ड इज गोल्ड ची स्थापना करून भाजप मधे न्याय मिळावा म्हणुन आवाज उठवला होता .सर्व कार्यकर्त्यांनी अलिबाग ट्रॅप ही केली होती, परंतु भाजपा तथाकथित प्रस्थापित मंडळींनी बोटावर मोजण्या एवढ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या बॉडी वरती घेतलं ..
2022 पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकी च्या पार्श्वभूमीवर आजही पक्षातीत असंख्य कार्यकर्ते नाराज आहेत. अशा नाराजीतुनच वैजनाथ शिरसाट यांनी 2022 लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला आहे .
भाजपमधील निष्ठावंत नाराज कार्यकर्त्यांनाही पुढच्या काळात आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश देऊन लढण्याचे बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
वैजनाथ शिरसाट हे वंजारी समाजातील एक लढवय्ये कार्यकर्ते आहेत ओबीसी संघर्ष सेना पिंपरी चिंचवड या संघटनेचे ते शहराध्यक्ष आहेत, त्यांनी ओबीसीतील अठरा पगड जातींना एक करून संघटन उभे केले आहे , शहरातील स्थानिक ओबीसी ही या संघटने बरोबर आहेत, दिड हजारहून जास्त सदस्य संघटनेत काम करतात समाजासाठी वैजनाथ शिरसाठ अहोरात्र परिश्रम घेत आहेत येत्या काळात 2022 मधे ओबीसी सह संपूर्ण बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये यश संपादन करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले उचलली आहेत