व्हीएसआरएस न्युज पिंपरी
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
५ एप्रिल रोजी राज्यात कोरोणाची वाढती रुग्नसंख्या लक्षात घेता आपण या राज्यात लाॅकडाऊन जाहीर केले.
या लाॅकडाउन मध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे परंतु न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी ,परीट ,फुलव्यवसायीक .इ १२ बलुतेदारांमधील छोट्या जातींमधील परांपरागत व्यवसाय पुर्णता बंद आहे आधीच गरीब परिस्थितीत असलेला हा समाज लाॅकडाऊन मध्ये आर्थिक अडचणीत आलेला आहे. एकप्रकारे या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे आपण लाॅकडाउन जाहीर करताना अॅटो रिक्षाचालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इ लोकांकरीता आर्थिक सहाय्य जाहीर केले परंतु न्हावी, सुतार शिंपी ,कुंभार , परीट,फुलव्यवसायीक इ १२ बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक सहाय्य जाहीर केले नाही.
आपण राज्यातील १२ बलुतेदारांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून परंपरागत व्यवसायिकांना प्रतीकुटुंब ५००० रु आर्थिक सहाय्य करावे असे निवेदन
महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर, भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे व आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डी येथे तहसिलदार मा .गीता गायकवाड मॅडम यांना देण्यात आले .यावेळी पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रासकर, ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष राजेश डोंगरे, योगेश मोरे, सचिन मदने, चेतन पंडित आदी उपस्थित होते