व्हीएसआरएस न्युज –आज दि.११-१-२०२१ श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संताजी हितवर्धिनी संस्था धानोरे आळंदी येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रासकर यांच्या शुभहस्ते पुजन व आरती करण्यात आली.
तेली समाज बांधवांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेली समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातुन ओबीसी मोर्चा कायम काम करत राहील असे आश्वासन कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना रासकर यांनी दिले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सुरेशजी गाडगे, विजयराव पांडव, क्रुष्णा चाफले, सुरेश रहाणे, राजेंद्र ढवळे, रविंद्र भागवत, संतोष अडचुले, साहेबराव खेडकर, विजय झंझाट, सुनिल फाटे, मिराताई साखरकर,उषाताई जामोदे, दिनेश गावत्रे राहुल साखरकर, रामभाऊ अवचार यांसह अनेक तेली बांधव उपस्थित होते