व्हीएसआरएस न्युज आकुर्डी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै.ह.भ.प प्रभाकर मल्हाराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल आकृर्डी येथे सुरू होणाऱ्या १३२ बेडच्या इमारतीची पाहणी आज खासदार बारणे व मा. आयुक्त राजेश पाटील यांनी केली.
सोबत नगरसेवक प्रमोद कुटे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार, रविद्र नामदे, शहर अभियंता राजन पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, डॉ. अनिल रॉय, डॉ लक्ष्मण गोफणे डॉ सुनिता साळवी, डॉ. पल्लवी, ज्यू.इंजि.प्रताप मोरे, ई .उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, आकुर्डी, थेरगाव या हॉस्पिटलमधील काही बेड कोरोना रुग्णांसाठी सुरू केले जाणार आहेत. ही हॉस्पिटल अद्यावत प्रकारची आहेत. आकुर्डी हॉस्पिटल तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. तर, थेरगाव हॉस्पिटल काही दिवसांनी चालू होईल. या हॉस्पिटलच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडकरांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील.