व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यपदी भाजपचे तुषार हिंगे यांची आज (दि.०९) महासभेत निवड करण्यात आली.
भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी राजीनामा दिल्याने शिक्षण समितीतील एक जागा रिक्त झाली होती. त्याजागी तुषार हिंगे यांची निवड झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (दि.०९) आयोजित करण्यात आली. महापौर माई ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.
शिक्षण समितीची मुदत जुलै महिन्यात संपली होती. मात्र, कोरोनामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बधांमुळे नवीन सदस्यांची निवड झाली नव्हती. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे १३ ऑक्टोबर रोजी शिक्षण समिती सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात भाजपच्या माया बारणे यांचाही समावेश होता.
मात्र, गेल्या महिन्यात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे समितीतील एक जागा रिक्त होती. त्याजागी भाजपचे तुषार हिंगे यांची निवड करण्यात आली. शिक्षण समितीत सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक असे नऊ सदस्य आहेत.