व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
कू गायत्री मारुती सोनटक्के राहणार पिंपरी वय 16 वर्षे ह्या गरीब कुटुंबातील मुलीच्या हृदयाला लहानपणापासून होल होते.
तिच्या शत्रक्रियेसाठी मोठा खर्च अपेक्षित होता, तो खर्च कसा करायचा असा पेच सोनटक्के कुटुंबीयांवर होता, परंतु भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव श्री अमित गोरखे यांनी यावर मार्ग काढला व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने हे ऑपरेशन एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात आले.
व शस्त्रक्रिये साठी एक रुपयाही खर्च झाला नाही व सहा तासाचे मोठे ऑपरेशन मधून ही कन्या आज महिला दिनी सुखरूप दवाखान्यातून घरी परतली याचा आनंद मोठा आहे ,आम्ही श्री अमित गोरखे तथा आमदार लक्ष्मण जगताप तसेच भाजपा अनुसूचित जातीचे पदाधिकारी श्री यशवंत दनाने, श्री महेश भिसे,श्री विजय वाघमारे,श्री अंकुश धेडे,श्री मधुकर धेडे, श्री प्रकाश इगवे,श्री अनिल वायदंडे,श्री नेताजी शिंदे व श्री सतीश कांबळे या सर्व मित्र परिवाराचे ऋणी आहोत असे तिचे वडील मारुती सोनटक्के यांनी सांगितले..