व्हीएसआरएस न्युज निगडी-गेल्या वर्षी देखील दिवाळीला कर्मचारी यांना पगार आणि बोनस मिळाला नव्हता है समजल्यानंतर चिखले यांनी स्वतःच्या खिशातून कर्मचारी यांना प्रत्येकी ५ हजार रु देऊन त्यांची दिवाळी गोड केली होती. या वर्षी देखील सर्व कर्मचारी यांची चिखले यांनी दिवाळी
गोड केली आहे. चिखले यांच्या या दानशूर व समजूतदारपणाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले.
मागील सहा सात महिन्यापासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या कोरोनाच्या काळात प्रत्येकजण स्वताचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होता. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तर खुद्द रक्तांच्या नात्यांनी देखील पाठ फिरविल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले. परंतु केवळ पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर शहराबाहेरील कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांना देखील निगडी विधुतदाहिनी येथील कर्मचाऱ्यांनी अनी दिला आहे. त्यांच्या कामांचे आणि धाडसाचे कौतुक करत नगरसेवक सचिन चिखले यांनी दिवाळीनिमित्त त्यांना छोटीशी आर्थिक मदत आणि मिठाई वाटप करत माणुसकी दाखविली आहे.
कोरोनाच्या काळात रात्रंदिवस स्वताच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता निगडी येथील विधुतदाहिनी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वताच्या खिशातून बोनस आणि मिठाई वाटप करत नगरसेवक सचिन चिखले यांनी या कोरोना योध्यांची दिवाळी गोड केली.