व्हीएसआरएस न्युज मुंबईतील फेरीवाल्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अँड. अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते
मुंबईतल्या फेरीवाल्यांचे पुन्हा एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत निर्णय हा घेण्यात आला.
मुंबईत यापूर्वी 2014मध्ये फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण झाले होते.
आता सर्व्हेक्षणासंदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकाऱयांनाही स्थान देण्यात येईल.