व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरीतील पूर्णाकृती पुतळ्यासभोवती मेणबत्ती आणि विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
या रोषणाईमुळे सभोवताल उजळून निघाला असून, बाबासाहेबांच्या अनुयायांनी अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ( रविवारी) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन म्हणून त्यांच्या अनुयायांनी पिंपरीतील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासभोवती मेणबत्ती आणि विद्युत दिव्यांची रोषणाई केली आहे. रोषणाईने परिसर उजळला असून, आकर्षक दिसत आहे.
डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू नगर सैन्य छावणीत झाला होता. ते रामजी मालोजी सकपाल आणि भीमाबाई यांचे 14 वे पुत्र होते. आंबेडकरांनी मुंबई विश्वविद्यालयातून बी.ए, कोलंबिया विश्वविद्यालयातून एम.ए, पीएच.डी, एलएल.डी, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून एमएस.सी,डीएस.सी आणि ग्रेज इनमधून बॅरिस्टरचा अभ्यास केला आहे.
डॉ. आंबेडकरांचे खरे आडणाव अंबावडेकर होते. पण, त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांचे नाव शाळेच्या रिकॉर्डसमध्ये आंबेडकर असे टाकले. डॉ. आंबेडकर पहिले असे भारतीय होते ज्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रातील डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. ते एकमेव भारतीय आहेत ज्यांची प्रतिमा लंडन संग्राहलयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत लावण्यात आली आहे. त्यांनी दलित बौद्ध आंदोलनाला प्रेरित केले आणि अस्पृशतेच्या सामाजिक भेदभावाविरोधात अभियान चालवले. डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री, भारतीय संविधानाचे जनक आहेत.