व्हीएसआरएस न्युज आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने नवी सांगवी प्रभाग क्रमांक ३१ मधील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत ऑनलाईन कोविड केअर शिबिर ला जोरदार प्रतिसाद मिळाला.
आयोजक ललित जालिंदर म्हसेकर म्हणाले, नवी सांगवी प्रभाग क्रमांक ३१ मधील नागरिकांनी या ऑनलाईन शिबिरीला जोरदार प्रतिसाद देत या ऑनलाईन शिबिर चा कालावधी वाढविण्याची महिला वर्गाने मागणी केली आहे, त्यामुळे या शिबिर चा कालावधी ३० दिवस वाढविण्यात आला आहे, व या ऑनलाईन शिबिर मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत व मनपूर्वक आभार आयोजक ललित जालिंदर म्हसेकर यांनी मानले.