व्हीएसआरएस न्युज मोशी-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी प्राधिकरण येथे स्पाईन सिटी परिसरात मोकळ्या जागेत अंदाजे 30 वर्षे पुरुषाचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
मोकळ्या जागेत सोडलेला जनावरांना घेण्यासाठी गेलेल्या एका जणांचे निदर्शनास हा मृतदेह आला. त्याने याबाबत एका महिलेला सांगितले. त्या महिलेने सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असतानाच, मोशी प्राधिकरणात एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला हा घातपाताचा प्रकार असून शर्ट च्या सहाय्याने गळा आवळून खून केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.