व्हीएसआरएस न्युज आकुर्डी- महापौर माई ढोरे व पिं चिं पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या शुभहस्ते दि. 17 मार्च 2021 रोजी करण्यात आले.
हार्ट अँटँक, अपघात याविषयी लोकामध्ये जागृती आहे. पण आजही ब्रेन स्ट्रोक बाबत लोक अनभिज्ञ आहेत.गोल्डन अवरमध्ये तातडीक सेवा मिळाली तर यामुळे उपचारा अभावी होणारे कायमचे अंपगत्व दुष्प परिणाम तसेच प्रसंगी उद्भवणारी जिवीतहानी टाळता येवु शकते. हे काम अत्यंत महत्वाचे असल्याने हा उपक्रम पिं चि.मधील नागरिक मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फारच उपयुक्त आहे. लोकमान्य ने कोविडच्या काळातील गरजुची केलेली सेवा ही खरी ईश्वरसेवा असुन त्यांनी हा लोकसेवेचा रथ “चरैवती,चरैवती “असाच चालत ठेवावा असे गौरवोद्गार पिंचिं पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी काढले.
या सेंटरची संकल्पना व प्रास्ताविक सुप्रसिद्ध न्युरोफिजीशियन डाॅ. अमितकुमार पांडे यांनी केले.
तोंड वाकडे होणे, हाता पायातील ताकद कमी होणे, तोतरे बोलणे,जीभ जड वाटणे, बेशुद्घ होणे अशी लक्षणे असल्यास नागरिकांनी 9822242100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत अँम्ब्युलसची सेवा रुग्णांना उपचारासाठी देण्यात येईल अशी माहिती डाॅ.श्रीकृष्ण जोशी यांनी दिली.