व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
आज एकही मृत्यू झाला नाही. शहरात आजपर्यंत 96 हजार 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 675 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील 1745 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 717 अशा 2462 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.
सध्या 764 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1239 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.