व्हीएसआरएस न्युज पिंपरी-शहरातील 29 आणि महापालिका हद्दीबाहेरील 17 अशा 46 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 44 हजार 663 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या 13 हजार 361 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 8 हजार 795 रुग्ण गृहविलगीकरणात असून 4 हजार 566 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरामध्ये 1099 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 27 हजार 498 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 4566 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 8795 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 13 हजार 361 इतकी आहे.