व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी दिलासादायक बातमी आज समोर आली आहे दिवसेंदिवस वाढणारे कोरोना चे रुग्ण आता कोठे तरी कमी व्हायला लागले आहेत आज पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात नवीन कोरोना बाधितांची संख्या १२९३ इतकी नोंद झाली आहे.
मागील काही दिवसापासून वाढणारी कोरोना बाधित संख्या निम्म्याने घटली आहे पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२९३ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून आज पर्यंत दोन लाख १९६० इतके कोरोना बाधित संख्या झाली आहे तर आज दिवसभरात ३४६९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यानुसार आजपर्यंत एकूण १ लाख ७५ हजार १४८ रुग्ण | कोरोना मुक्त झाले आहेत तसेच आज दिवसभरात ९३ जणांचा मृत्यू झाला असून आज पर्यंत तीन हजार ९७९ जण कोरोना ने दगावले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोरोना रुग्ण संख्या पुढील प्रमाणे..
अ प्रभाग – १२० रुग्ण
ब प्रभाग – १९३ रुग्ण
क प्रभाग १२१ रुग्ण
ड प्रभाग – २५५ रुग्ण
इ प्रभाग – २२८ रुग्ण
फ प्रभाग- १२७ रुग्ण
ग प्रभाग – १०२ रुग्ण
ह प्रभाग – १४७ रुग्ण…
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३८ पुरुष चिंचवड (६८ ,५५,६३,३९,३७ वर्षे), पिंपरी (७१,५४,४८ वर्षे), रहाटणी (५३,५४ वर्षे), थेरगाव (३५,३७ वर्षे), पिं. गुरव (९७,७५ वर्षे), वाकड (६५,२६,४७ वर्षे), मोशी (७२ वर्षे), पिं. सौदागर (५७ वर्षे), कासारवाडी (७३ वर्षे), भोसरी (५९,७८ वर्षे), वाल्हेकरवाडी (५२ वर्षे), चिखली (७२, ३८ ,३७,२९ वर्षे), सांगवी (६१,४९,६६ वर्षे), आजमेरा (७७ वर्षे), निगडी (५६ वर्षे), दापोडी (७२ वर्षे), फुगेवाडी (५० वर्षे), वल्लभनगर (६४ वर्षे), शाहुनगर (६२ वर्षे), किवळे (४९ वर्षे) – १६ स्त्री- चिखली (६७ वर्षे), दापोडी (५८ वर्षे), सांगवी (६३,४० वर्षे), काळेवाडी (४२ वर्षे), संत तुकारामनगर (५५,६५ वर्षे), निगडी (५८ वर्षे), भोसरी (५४,६९,५५ वर्षे), थेरगाव (५६ वर्षे), मोशी (६० वर्षे),पिं. गुरव (६० वर्षे), कासारवाडी (८० वर्षे), दिघी (३५ वर्षे), येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २५ पुरुष – आळंदी (५२,३८ वर्षे), धाणोरी (५२ वर्षे), हिंजवडी (७५ वर्षे), नाशिक (३३ वर्षे), पाईट (४१ वर्षे), पुणे (५३,३७,७३, ६६ वर्षे), पानशेत (३३ वर्षे), बारामती (४२ वर्षे), चाकण (५८ वर्षे), लोणीकंद (७८ वर्षे), देहुगाव (६१ वर्षे), लोहगाव (६१ वर्षे), पर्वती (८० वर्षे), खडकी (६८ वर्षे), दौंड (६५ वर्षे), बाणेर (८० वर्षे), खेड (५५ वर्षे), लोणावळा (४७ वर्षे), धायरी (४१ वर्षे), धणकवडी (६२ वर्षे), मुंढवा (६० वर्षे), १४ स्त्री – विमाननगर (४९ वर्षे), आंबेगाव (६५ वर्षे), खेड (५५, ६०, ५७ वर्षे), शिक्रापुर (४७ वर्षे), लोहगाव (८०,४६ वर्षे), पुणे (६४, ७६ वर्षे), वडगाव (७० वर्षे), सहकारनगर (५४ वर्षे), तळेगाव (७८ वर्षे), देहुरोड (६५ वर्षे) येथील रहिवासी आहे.