व्हीएसआरएस न्युज पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर क्षेत्रातील शाळांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. पुणे ग्रामीण क्षेत्रातील शाळा यापूर्वीच 23 नोव्हेंबरला सुरू झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील केरोनाची परिस्थिती काहीशी कमी झाल्याने प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळा सुरू होण्यासंदर्भातील लेखी आदेश काढण्यात आला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.पुण्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी निर्णय घेतले आहेत. तशी घोषणा त्यांनी दोन दिवसांपूर्वी केली.
परंतु, लेखी आदेश काढण्यात आलेले नाहीत. माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे म्हणाल्या, ‘इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांनी अटींची पूर्तता केली आहे, त्या शाळा उद्यापासून सुरू होतील.
हर्डीकर यांनी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या व कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच कामावर हजर करून घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी शाळेतील शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची “कोविड टेस्ट’ बंधनकारक केली आहे.
शहरातील महापालिकेच्या व खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू करण्यात येणार आहे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे . कोविड टेस्ट निगेटिव्ह आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच नियुक्त करावे, विद्यार्थ्यांचे पालकांचे संमतिपत्र घ्यावे व शाळा, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना सर्व शाळा व्यवस्थापनाला केल्या आहेत.