व्हीएसआरएस न्युज -ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन संघटनांची कृती समिती
पिंपरी चिंचवडयांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी पुणे -मुंबई सायकल – बाईक रॅली आयोजन केले आहे.
आकुर्डी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.20 जानेवारी ते 24 जानेवारीला ही रॅली निघणार आहे.ऑल इंडिया किसान संघर्ष समितीच्या आव्हाना नुसार दिनांक 24 . 1. 2021 पासून दिनांक 26. 1 .2021 पर्यंत राजभवन मुंबई या ठिकाणी तीन दिवशीय धरणे आंदोलन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून वर उल्लेख केलेल्या सर्व जनसंघटना मिळून सायकल/बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे.
सायकल/बाईक रॅली
यवत कुरकुंभ पासून चालू होऊन रांजणगाव, शिक्रापूर चाकण मार्गे पिंपरी चिंचवड मधून मुंबईकडे मार्गस्थ होईल संबंधित रॅली दिनांक 20 .1. 2021 रोजी सुरु होऊन दिनांक 24. 1 .2021 रोजी मुंबई येथे पोहोचेल.
तीन दिवसीय पुणे जिल्ह्यातील रॅलीमध्ये औद्योगिक तसेच नागरी परिसरामध्ये यामध्ये प्रत्येक दिवशी किमान तीन ठिकाणी कोपरा सभा चे आयोजन अनेक संयोजन समितीकडून केले जाईल.. पत्रके वाटप.. नागरिकांमध्ये प्रचार, शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांबाबत जागृती व त्या विरोधातील चळवळीमध्ये सहभागाचे आवाहन केले जाईल..
यासोबत सभा घेण्यासाठी एक छोट्या टेम्पोवर मायक्रोफोन आणि स्टेजचे आयोजन केलेले असेल.
तीन ठिकाणी मुक्काम करेल . ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्याठिकाणी रॅली मधील सर्व कार्यकर्त्यांची राहण्याची जेवण्याची व इतर सर्व सोयी सुविधांचे नियोजन त्या ठिकाणावरील संबंधित संघटना करतील.
मुक्कामाचे ठिकाण
दि. 20 जानेवारी रांजणगाव
दि.21 जानेवारी शिक्रापूर
दि. 22 जानेवारी अकुर्डी
दिनांक 23 जानेवारी देहू रोड..
सायकल जात यामध्ये किमान पन्नास सायकली सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी असाव्यात अशी अपेक्षा आहे.. याव्यतिरिक्त दोन दिवसांसाठी देखील कामगार आणि कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होऊ शकतील.