व्हीएसआरएस न्युज पिंपरी- संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला.
27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2020 या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये 35 संघांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा अतिशय सुरेख व आनंदमय वातावरणात पार पडली यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता व उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी फायनल मॅच संपन्न झाली यावेळी फायनल मॅच मध्ये अतिशय रंगतदार पद्धतीने पप्पू शेठ घोरपडे आळंदी पसायदान या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तर दुसऱ्या क्रमांकावर मियाजी ११ पुणे हा संघाने पटकविला तिसरा क्रमांक साई समर्थ धानोरे यांनी घेतला आणि चौथा क्रमांक अँथोनी फ्रान्सिस पिंपरी या संघाने मिळवला. पोलिस संघ विरुद्ध पत्रकार संघ ही प्रेक्षणीय लढत स्पर्धेचे आकर्षण ठरली.
सदर पारितोषिक वितरण पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय चे अप्पर पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन भाऊ साठे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे विधी अधिकारी प्रसाद सांगळे उद्योगपती विश्वास दळवी माजी नगरसेवक शंकर शेठ जगताप डॅनियल अँथोनी,पास्टर म्हात्रे यांच्या हस्ते बक्षिस समारंभ पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामगार नेते दिनकर इंगळे, रमेश दादा बागवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेषराव कसबे, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे सचिव कृष्णराव गिरे, पास्टर मार्क वरप्रसाद, पिंपरी-चिंचवड शहर सेवादलाचे माजी अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, गौरव चौधरी, उद्योगपती अरुण पवार, डेव्हिड काळे, अमोल करडक, संदीप गायकवाड, प्रशांत बनकर, डॅनियल दळवी, स्नेहल डोंगरदिवे, कुशल सोज्वळ, अभिषेक कुवर, मीखाएल गायकवाड, सुमीत बोर्डे आदी उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यासाठी सनी कसबे, रोहित पाटील,दीपेश पाटील, सुरज जाधव, वैभव वैरागर यांनी सहकार्य केले.पंच म्हणून सुशांत म्हात्रे, संजय बाराते आणि मेहबूब शेख यांनी काम पाहिले तर सामन्यांचे समालोचन उत्तम सावंत ह्यांनी केले.
विशेष सहकार्य सांगली पोलीस स्टेशन व जलसंपदा विभाग यांनी केले.