व्हीएसआरएस न्युज -साद सोशल फांडेशनच्या वतीने गुरुवारी (दि. १२) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील अंध बांधवांच्या कुटुंबीयांसाठी आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात “दिवाळी फराळ वाटप” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी इरफान सय्यद बोलत होते. यावेळी जवळपास शंभर अंध बांधव व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. अंध बांधवांच्या दिवाळीत प्रकाशवाटा पेरण्यासाठी आणि त्यांच्या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाऊंडेशन चे संघटक भाऊसाहेब कोकाटे तर आभार सर्जेराव कचरे यांनी मानले.
डोळ्याला दिसत नसणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. आज कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी दिवाळीचा आनंद संयमाने लुटावा. उद्धवसाहेबांनी नागरिकांसाठी राबविलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून, नागरिकांनी कोरोनापासून दूर रहावे व कमी प्रमाणात फटाके वाजवून प्रदूषण रोखावे. शहरवासियांनी कोरोनाचा अंधकाररुपी राक्षस संपविण्यासाठी जास्तीत जास्त दीप प्रज्वलन करून, शहर प्रकाशप्रमाणे तेजोमय करावे, असे प्रतिपादन कामगार नेते इरफान सय्यद यांनी केले.