व्हीएसआरएस न्युज पिंपरी- दि. १२,
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व दिवंगत काँग्रेस नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ व्या जयंती निमित्त वल्लभनगर येथील यशवंतरावांच्या पुतळ्याला पिंपरी चिचंवड शहर युवक काँग्रेस च्या पदाधिका-यांनी पुष्पहार अर्पण केला व श्रध्दाजंली वाहिली.
या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले,
“महाराष्ट्रात झालेल्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकासाची मुळे ही यशवंतरावांच्या कार्यात आहेत. त्यांनी असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले. काही ठळक निर्णय पुढीलप्रमाणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व्यवस्थेची सुरुवात,प्रशासकीय विकास व राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ,आर्थिक विकास व कोल्हापूर बंधार्यांचा प्रचार,कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती,१८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना, मराठवाडा व आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठाची स्थापना, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग आदि कार्य करून महाराष्ट्र संपन्न केला.
ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असे त्यांचे गुणवर्णन करता येईल.
गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी अविश्र्वसनीय झेप घेतली.
प्रादेशिकतेच्या मर्यादा सहज ओलांडून राष्ट्रीत्वाला स्पर्श करू शकणारे. कर्तृत्व, साहित्य, कला, संस्कृतीच्या सहज स्पर्शाने उन्नत झालेली रसिकता आणि काडोविकडीच्या प्रसंगातून मार्गक्रमण करू शकणारे राजकीय धुरीणत्व अशा अभिजात नेतृत्वाचा वारसा महाराष्ट्राला देणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती त्यांना आमचे विनम्र अभिवादन”.
असे बनसोडे म्हणाले.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे,शहर सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, राहूल काळभोर, मिलिंद बनसोडे, अलोक लाड, विशाल सरवदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी,चिचंवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अर्णव कामठे, आफताब चौधरी, प्रविण जाधव, किशोर धनवे,आकाश पवार आदि पदाधिकारी उपस्थित होते.