व्हीएसआरएस न्युज माेताळा: दि- २२ आक्टोंबर २१ (शुक्रवार) उच्चशिक्षित युवा तथा धामणगाव बढे ग्रामपंचायतचे सदस्य हाफिज शेख सादिक साहेब यांनी आज कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. याआधी ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते.
मनमिळाऊ व्यक्तीमत्व, सेवाभावी, मदतीसाठी नेहमीच अग्रेसर अशी ओळख असलेल्या हाजिफ शेख सादिक यांनी गावांसाठी खूप काम केले आहे. गावातील सर्वधर्मीय लोकांमध्ये त्याच्याविषयी माेठा आदर व मानसन्मान आहे. उच्चशिक्षित असल्या कारणाने त्यांनी गावातील नागरिकांमधे जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. लाेकांची मदत करताना कित्येकदा त्यांनी स्वतच्या पैशातून मदत केली. त्यांनी गावा मध्ये स्वखर्चाने जिथे लाईटची आवश्यकता होती तिथे लाईटची व्यवस्था केली.
मोताळा तालुका कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. गजानन मामलकर, काँग्रेसचे नेते अँड. गणेशसिंग दादा राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हाजिफ शेख सादिक यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित हाेती. हाफिज शेख सादिक यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे या भागात काँग्रेसची ताकद वाढण्यास मदत हाेणार असल्याचे बोलले जात आहे.
Discussion about this post