व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 26 जानेवारी निमित्त एक दिवसाचा पोलीस अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना बनविण्याचा उपक्रम राबविला.
त्यात अंध असलेल्या रिना पाटील या एक दिवसाच्या पोलीस आयुक्त, एकल माता ज्योती माने एक दिवसाच्या अपर आयुक्त तर विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर पोलीस उपायुक्त बनला. या सुखद धक्क्यामुळे पोलीस आयुक्त आणि इतर अधिका-यांचा पदभार स्वीकारणारे तिघेही भारावून गेले.
सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अधिकारी होण्याचा अनुभव यावा. यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात असलेली भीतीची दरी कमी होऊन आदराची भावना वाढीस लागावी. तसेच नागरिकांना देखील पोलिसांची कर्तव्ये, शिस्तबद्ध काम, आव्हाने यांची ओळख व्हावी, यासाठी ‘एक दिवसाचा पोलीस अधिकारी’ हा उपक्रम पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राबवला.