व्हीएसआरएस मराठी न्युज –यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव हद्दीत कि.मी ७४/९०० व खंडाळा हद्दीत कि.मी ५६/९०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दि ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.
या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार ) किवळे पुलावरून जुना मुंबई -पुणे महामार्गावरून मुंबई दिशेला वळविण्यात येणार आहे. पुणे ते मुंबई जुना महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोल नाका येथून एक्सप्रेस वेवर मुंबई दिशेने सोडण्यात येतील.
Discussion about this post