Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चर्होली येथे दि. ०६ डिसेंबर रोजी मध्यरात्री एका व्यक्तीने जाणूनबुजून लावलेल्या आगीत ५ वाहने जळून खाक झाली.ही घटना चऱ्होलीतील तनिष पर्ल येथे घडली.
या प्रकरणी देवेंद्र गोपाळ तापकीर (रा. चऱ्होली) याच्याविरोधात नितीन शिवाजी जवक (वय 33, रा. तनिष पर्ल सोसायटी, चऱ्होली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिघी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने तनिष पर्ल सोसायटीच्या पार्किंगमधील दुचाकीचा पेट्रोल पाईप काढून वाहनांना आग लावली. या घटनेत जळालेल्या वाहनात तीन मोटारसायकली, दोन कार्स यांचा समावेश आहे. याशिवाय इमारतीची सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन आणि रंगरंगोटी यांचे असे मिळून १० लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
Discussion about this post