व्हीएसआरएस न्युज पुणे- तीस किलोमीटर ताशी वेगाने शहरातून चालवताना शाळेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी तीस किलोमीटर वेगाने सुरक्षित वाहने चालवावे याबाबतचा वेबिनार परिवहन विभागाच्या वतीने संजय ससाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी आयोजित केला होता.
या वेबिनार मध्ये परिवहन विभागातील 2017 बॅचचे अधिकारी जे 2019 ला परिवहन विभागामध्ये रुजू झाले होते. त्यांनी या सेमिनारमध्ये भाग घेतला सेमिनार चे उद्घाटन जितेंद्र पाटील प्रभारी अतिरिक्त ट्रान्सपोर्ट कमिशनर व सह परिवहन आयुक्त रोड सेफ्टी विभाग यांच्या शुभहस्ते झाले. सदर वेबिनार बद्दल जितेंद्र पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. तिच्या वेबिनार च्या माध्यमातून परिवहन विभागातील अधिकारी upgrade होण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे परिवहन विभाग म्हणून रस्ता सुरक्षा मध्ये विविध जबाबदाऱ्या अधिकारी म्हणून पार पाडाव्या लागतात यासाठी मदत होणार आहे. सदर वेळी वेबिनार मध्ये विनायक जोशी वाहन चालवताना वाहनाचे स्पीड वाहन चालकांची मानसिकता रिॲक्शन टाईम वाहन थांबवण्यात लागलेला वेळ हा फार महत्वाचा असतो या विषयावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
अजय गोवाळे युनायटेड वे मुंबई यांनी रस्ता सुरक्षा मधील सामाजिक संघटना चा सहभाग महत्वाचा असल्याचे म्हटले या मिशन बाबत वाहन चालक पादचारी व रस्त्याचा उपयोग करणारे सर्व घटक यामध्ये जागृती साठी आपण सर्वांनी काम करणे आवश्यक आहे डब्ल्यू आय ए ए च्या सिमरन कौर यांनी सर्व सामाजिक संस्थांना व रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येऊन शहरी भागांमध्ये वाहनाचा वेग कमी करण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी कमी वेगाचे विभाग आपल्याला निर्माण करुन त्याची अंमलबजावणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करावी लागेल असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचा उद्देश व आवश्यकता सहाव्या जागतिक ग्लोबल रोड सेफ्टी सप्ताहानिमित्त संजय ससाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी वेबिनार मध्ये सर्वांना समजून सांगितलं.
डॉक्टर निर्मल कुमार राक्षे फाउंडर ऑफ यु एन एम लाईट केअर सर्विसेस यांनी पादचाऱ्यांची हक्क प्रत्येक शाळेमधून विद्यार्थ्यांना व पादचाऱ्यांना समजून सांगणे फार गरजेचे व आवश्यक झालेले आहे.
सदर वेबिनार मध्ये जयंत पाटील उप प्रादेशिक परिवहन, अधिकारी ठाणे योगेश बाग निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, राजू घाटोळे, ज्ञानेश्वर वाघोले सरकार मान्य राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. सदर वेबिनार यशस्वी करण्यासाठी दिनेश पाटील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पुणे, नम्रता सानप सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नाशिक यांनी वेबिनार मधील व्याख्यात्यांची ओळख करून दिली. वेबिनार मध्ये सहभागी झाल्याबद्दल उपस्थितांचे आभार श्रद्धा माने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सातारा यांनी आभार मानले.