व्हीएसआरएस न्युज –
पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय सर्वसाधारण रुग्णांसाठी खुले करावे अशी मागणी प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय गायक यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. महापापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
की, महापालिकेच्या वतीने वायसीएम रुग्णालय कोवीडसाठी वापरले जात आहे. ते सर्वसाधारण रुग्णांसाठी लवकरात लवकर खुले करावे खासगी रुग्णालयांत गोर गरीबांची आर्थिक लूट करण्यात येत आहे.