व्हीएसआरएस न्युज सुरत : ट्रकखाली चिरुडून १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे ही दुर्घटना घडली. एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला.
यावेळी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले. यात १५ जणांचा मृत्यू झाला असून सहा पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांचा आकडा वाढम्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृत मजूर राजस्थानचे असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.