व्हीएसआरएस मराठी न्युज –दऊळगावराजा, १४ जानेवारी संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव मेहुणा राजा येथे मागील पंचवीस वर्षापासून सातत्याने साजरा होत आहे याचा मला अभिमान आहे. हा उत्सव लोकोत्सव व्हावा असे प्रतिपादन संत चोखामेळा उत्सवाचे प्रणेते माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. जिल्हा परिषदेतर्फे संत चोखामेळा यांचा ७५६ व्या जयंती उत्सव मेहुणाराजा येथे साजरा करण्यात आला.
सकाळी सूर्योदयी जिल्हा परिषदेतर्फे महापूजा व महाआरती झाली. यानंतर चोखामेळा यांची जन्मभूमी येथे आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी विविध विकास कामाचे भूमिपूजन केले व संत चोखोबा यांना अभिवादन केले. यावेळेस जिल्हा परिषदचे अधिकारी व राजकीय पक्षाचे मान्यवर उपस्थित होते यावेळी – पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण गीते, कमलेश खिल्लारे यांनी संत चोखामेळा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, जि. प. सदस्य शीला शिपणे, अॅड. नाझेर काजी, उषा खेडेकर, डी.टी.शिपणे, डॉ. रामप्रसाद शेळके, दादाराव खाडे, राजू चित्ते, गजानन पवार, राजू शिरसाठ, गणेश सवडे, बाजार समिती सभापती समाधान शिंगणे, विष्णू बोंद्रे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, संतोष खांडेभराड, गंगाधर जाधव, संदीप शेळके, बबन कुमठे, सरपंच मंदा बोन्द्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जाधव तर आभार प्रदर्शन मुसदवाले यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप हा महाप्रसादाने झाला.
Discussion about this post