अकोला । व्हीएसआरएस न्यूज ।
शिंदे सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्याचा निर्णय घेतलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे अपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, या निर्णयामुळे फार काही उपकार केले असे होत नाही, असं विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. आणि बर्याच ब्रँड्सच्या स्पीकर आणि साउंड सिस्टमसह अधिक ऐका आणि अनुभवा, धक्कादायक 60% सूट
या सरकारला दोन आठवडे होत आले, मात्र राज्याला अजूनपर्यंत कृषिमंत्री मिळालेला नाही. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा लुळ्या पांगळ्या सरकारनं एक निर्णय घेतला म्हणजे उपकार केले नसल्याची टीका आमदार मिटकरींनी शिंदे सरकारवर केली आहे.
हे एक खुनशी सरकार असून ‘साम दाम दंड भेद’ वापरुन अनैसर्गिकरित्या सत्तेत आलं आहे. कधीपर्यंत टिकेल माहिती नाही. मात्र जनता हुशार आहे, मध्यावधी निवडणूक लागल्यास विशेषतः बंडखोरांना जागा दाखवून देईल असेही मिटकरी म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे इंधनावरील करात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील करकपातीची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्याने सरकारी तिजोरीवर ६००० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र, त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात राज्य सरकार जनतेला दिलासा देणारे निर्णय घेईल, असेही शिंदे यांनी सांगितले. आज मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होतील.
Discussion about this post