Breaking News : नवी दिल्ली : चीनमध्ये काल दि. १८ डिसेंबर रोजी मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या मध्ये अनेक इमारती कोसळल्या असून रस्त्यांना भेगा पडल्या. या दुर्घटनेत १११ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. जगभरातून चीनकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
चीन बरोबरच अफगाणिस्थान, म्यानमार, आणि भारतातील लडाख, कारगिल, अंदमान द्विपकल्प येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
चीनमध्ये काल मध्यरात्री जाणवलेला पहिला भूकंपाचा धक्का ६.०२ रिश्तर स्केलचा होता. त्यानंतर आज सकाळी सव्वासातच्या सुमारास पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला.ग्यांगसू आणि किंघाई प्रांतात जाणवलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमीनीत १० किलोमीटर खोलवर होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीत आणि वित्तहानी झाली. चीनीचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ऑल आऊट मोहिमेची घोषणा केली आहे.
चीनमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का आज दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी बसला. तो ४.८ रिश्तर स्केलचा होता. त्याचा केंद्रबिंदू जमीनीत ११८ किलोमीटर खोलीवर होता.
अफगाणिस्थानातही सकाळी पावणेसातच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला.त्याची तीव्रता ३.८ रिश्तर स्केल होती. म्यानमारमध्ये पहाटे सव्वापाचच्या सुमारास ३.८ रिश्तर स्केल भूकंपाचा धक्का जाणवला.
भारतात कारगिलमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास ३ रिश्तर स्केलचा धक्का जाणवला. तर, अंदमानच्या समुद्रात पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी ४.२ रिश्तर स्केलचा धक्का जाणवला.
एकाच वेळी अनेक देशात भूकंपाचे धक्के जाणवल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे.
Discussion about this post