Mumbai News : मुंबई : नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात नवी मुंबईतील साहित्यिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काही महिलांनी पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
या वेळी डॉ. वैशाली लोखंडे, वृषाली मगदूम, वैशाली घोरपडे, डॉ. भारती मोरे, फुलन शिंदे, अॅड. मानकुंवर देशमुख, कल्पना देशमुख, स्मिता भालेराव, सुषमा दांदडे, रजनीताई सुतार, जयश्री पाटील यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संदीप सुतार, सलुजा सुतार, मनीषा देसाई, उज्वला ढोले, केशर धाडगे, अॅड. वैशाली वाळुंजकर, शालिनी म्हात्रे, अस्मिता पाटील, ज्योती पाटील, माधुरी बाबर, रुझान चिलवान व इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post