व्हीएसआरएस न्युज आसामच्या 23 वर्षीय बॉक्सिंगपटू लव्हलिन बोर्गोहेनने (69 किलो) टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.
तुर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेली हिच्याशी झालेल्या लढतीत लव्हलिनाला पराभव पत्करावा लागला. यासह भारताने आत्तापर्यंत टोकीयो ऑलिम्पिकमध्ये तीन पदक मिळविले आहेत.
पदार्पणवीर लव्हलिना बोर्गोहेनने (69 किलो) टोकियो ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताच्या पहिल्या पदकाच्या जवळ पोहोचली होती. गेल्या आठवड्याच लव्हलिनाने चायनीज तैपेईच्या माजी विश्वविजेत्या नीन-शिन चेनला नामोहरम केले होते. उपांत्यपूर्व सामन्यात चेनचा 4-1 असा पराभव केला होता. आता उपांत्य सामन्यात तिची तुर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीशी लढत झाली.
बुसेनाझने उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनच्या अॅन लायसेन्कोला हरवले होते.
Discussion about this post