व्हीएसआरएस न्युज शुक्रवारी पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा सोहळा पार पडणार आहे.
तिथीनुसार बाबासाहेब पुरंदरे १३ ऑगस्ट २०२१ रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा नागरी सत्कार, कोविड मर्यादांचे पालन करीत मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमात व्हर्च्युअल सहभाग असेल. सुमित्रा महाजन, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येईल.
सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्रबुद्धे या गौरव समारंभात सहभागी असतील, अशी माहिती जगदीश कदम यांनी दिली.
Discussion about this post