व्हीएसआरएस न्युज पुणे – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बेधडक कामासाठी आणि सरळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.अजित पवार अगदी बिनधास्त बोलतात.त्यामुळे कार्यक्रमात अनेकदा हशा पिकतो.नियम जर पाळले गेले नाही तर दादा चांगलाच दम देखील भरतात.वेळेचे पालन करणारे, नियम पाळणारे,अधिकाऱ्यांना वेळोवेळी सुनावणारे दादा अनेकदा आपण पहिले आहेत, पण आज बारामतीत एका कार्यक्रमात दादांनी एका कॅमेरामनला चांगलेच सुनावले.आणि दम देखील भरला.
अजित दादांचे भाषण सुरू होते,एक कॅमेरामन विनामास्क सर्व कार्यक्रम शूट करीत होता.दादांनी भाषण सुरू असतानाच कॅमेरामनला म्हणाले “हा बघा पठ्ठ्या, तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय. सांगू का पोलिसांना तुला उचलायला. तुझ्यामुळे बाजूच्याला कोरोना व्हायचा” असं अजित पवार म्हणाले.दादांच्या या टोल्यामुळे तो कॅमेरामन देखील चांगलाच चपापला.
तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. प्रशासनाने जिल्ह्यात नियमाप्रमाणेच लसीचे वाटप करावे. उद्योग क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडूनही जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात येत आहे. पुढील महिन्यात जास्त लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेष गटातील औद्योगीक क्षेत्र, दिव्यांग, परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, गरोदर माता, बेड रिडन नागरिक, तृतीय पंथी आदींचे लसीकरण सुरु आहे.
Discussion about this post