व्हीएसआरएस न्युज पिंपरी -सामाजिक उपक्रम राबवून भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांचा वाढदिवस साजरा .
मिलिंदनगर लहुजी ब्रिगेट प्रतिष्ठान व रुबि अलकेअर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यपाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२० नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला.
स्व. दिनानाथ मंगेशकर रक्तपेठी पुणे व संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने पिंपरी गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Discussion about this post