व्हीएसआरएस मराठी न्युज -अहमदाबाद : दक्षिण आफ्रिकेतील दारुण अपयश, त्यानंतर संघात झालेले काही बदल, प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती आणि रोहित शर्माकडे पूर्णवेळ कर्णधाराची जबाबदारी नेतृत्व बदलाचे टीम इंडियाचे नवे पर्व बरोबर एक हजाराव्या सामन्यातून सुरू होत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. पहिला वनडे सामना टीम इंडियासाठी खास आहे. भारतीय संघ हजारावा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघ काळ्या फिती बांधून मैदानात उतरणार आहे.
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी मोहम्मद यादव, बी. , प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ
डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रूक्स, ब्रँडन किंग, किरन पोलार्ड (क), फॅबियन ऍलन, एनक्रुमाह बोनर, जेसन होल्डर, शाई होप, निकोलस पूरन, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, केमर रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडिन स्मिथ, हेडन वॉल्श.
Discussion about this post