व्हीएसआरएस मराठी न्युज भारतीय खेळाडू सुरेश रैना सुरेश रैना याच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. त्रिलोकचंद रैना हे बऱ्याच काळापासून कॅन्सरशी संघर्ष करत होते.
डिसेंबरमध्ये त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर सुरेश रैना गाजियाबाद येथील आपल्या निवासस्थानी वडिलांसोबतच होता. आजारी असलेल्या त्रिलोकचंद रैना यांनी रविवारी गाजियाबादच्या राजनगर येथे शेवटचा श्वास घेतला. त्रिलोकचंद हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. त्यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे मुळ गाव हे जम्मू-काश्मीर येथील रैनावारी हे आहे. १९९० मध्ये काश्मीरी पंडितांच्या हत्येनंतर त्रिलोकचंद यांनी गाव सोडले. ते गाजियाबाद येथील मुरादनगर येथे आले.
Discussion about this post