पुणे । व्हीएसआरएस न्यूज ।
लोणीकंद ते चाकण दरम्यान असलेल्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे आज पहाटेपासून पुणे (Pune) व पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. याचा परिणाम संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचं सांगितलं आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून आवाहन करताना सांगण्यात आलं की, महाराष्ट्रराज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 KV अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी ६ पासून खंडीत झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे . तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांना आवाहन करणेत येते की त्यांनी पाणी जपून वापरावे.
महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बिघाड . पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळपासून वीज पुरवठा खंडित. दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता . महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल, असं सांगण्यात येतंय महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.
महापारेषणाची लोणीकंद ते चाकण दरम्यान मोठी वीज वाहिनी आहे. त्यामध्ये बिघाड झाल्याने पहाटेपासून वीज बंद आहे. पुढील काही तासात वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात हडपसर, कोंढवा, कात्रज, धायरी, स्वारगेट, बाणेर, कोथरूड शिवाजीनगर रस्ता रोड फाटा रोड आजचा भाग वडगाव शेरी चंदन नगर टिंगरे नगर येरवडा यासह सर्वच भागातील वीजपुरवठा पहाटेपासून खंडित झालेला आहे पिंपरी-चिंचवड शहरातील पहाटेपासून वीज गेलेले आहे.
Discussion about this post